ताज्या घडामोडी

  • Home
  • ताज्या घडामोडी

गोकुळच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास आज पासून सुरुवात....

15-09-2026

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकी मुळे कोल्हापूरचं‌ राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आज सकाळपासून सुरुवात झाली... अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. यामुळे गोकुळच्या निवडणुकीचे रणशिंग आज फुकले गेले.. 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे...
यावर्षी गोकुळमध्ये 25 संचालकांची निवड होणार आहे.. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हालचालींना आता वेग आलाय... गोकुळच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यासह तब्बल 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे... अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया दरम्यान प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे... 23 सप्टेंबरला या अर्जांची छाननी होईल आणि 24 सप्टेंबरला वैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल... यानंतर 25 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारीची मुदत असेल.. नऊ ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांशी यादी व चिन्ह जाहीर होईल.. 18 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल...

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चौकशीची सीबीआयकडून मागणी

15-09-2026

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर सीबीआयने ३ पानांचा एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआय आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अभिनेता डिनो मोरिया आणि रिया चक्रवर्ती यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत हे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. "तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात पोलिसांनी तपास करून क्लोजर रिपोर्ट दिला होता, ज्यामध्ये आदित्य ठाकरेंचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले होते. ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कल्पनेतून हे षड्यंत्र रचले जात आहे," असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला.

जरांगेंची मुंबईकडे वाटचाल

15-09-2026

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अंतरवालीतून निघताना जरांगे अत्यंत भावूक झाले; गाडीत बसताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. "समाजाच्या लेकरांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार, सरकारपुढे झुकणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मला मारायचं तर मारू द्या पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
वाटेत कुटुंबीयांची भेट घेत जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा आपला मार्ग कायम ठेवला आहे. मात्र, गणेशोत्सवाचे दिवस असल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईच्या वेशीवरच अडवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, "आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता, मात्र सत्तांतरानंतर ते कोर्टात टिकवता आले नाही," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यामुळे, आंदोलनाची दिशा काय आणि याचं फलित काय याकडे सगळ्यांचा लक्ष लागून आहे.

यड्रावकरांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे; सैनिक टाकळीत ग्रामस्थ आक्रमक

12-09-2026

सध्या कोल्हापुरात गोकुळ निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे.. गोकुळ निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सैनिक टाकळी येथे ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. गावाच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाविरोधात आक्रमक झालेल्या माजी सैनिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी आमदारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.
गोकुळचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ आणि इतर नेत्यांसह आमदार यड्रावकर हे ठरावधारकांच्या भेटीसाठी सैनिक टाकळीत दाखल झाले होते. मात्र, ताफा पोहोचताच एमआयडीसी रद्द करण्याची मागणी करत आंदोलकांनी रस्ता अडवला. हा प्रकल्प यड्रावकरांच्या पुढाकारामुळेच येत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी "निषेध असो"च्या घोषणा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
काही दिवसांपूर्वीच शिरोळ तहसील कार्यालयावर या मुद्द्यावरून हिंसक आंदोलन झाले होते. आता थेट गोकुळच्या निवडणुकीच्या प्रचारातच आमदारांना काळे झेंडे दाखवल्याने शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जरांगेंची हळदीकुंकू डिप्लोमसी

12-09-2026

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. गणेशोत्सवाच्या काळातच, म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटीतून मराठ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल.
१९ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंचे आमरण उपोषण सुरू होईल. आंदोलनादरम्यान महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या घरी जाऊन हळदी-कुंकू करावे आणि "आमच्या लेकरांना आरक्षण द्या," अशी मागणी करावी, असे आवाहन जरांगेंनी केले. आणि जर त्या बाहेर आल्या नाही तर याची चर्चा अख्ख्या जगात होईल...
गृहखाते आणि पोलिसांनी आंदोलकांना वाटेत अडवू नये, असा इशारा देत जरांगे म्हणाले, "जिथे अडवाल तिथेच शांततेत ठिय्या मांडू." दगडफेक किंवा जाळपोळ न करता अत्यंत शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने हे आंदोलन पार पाडण्याची नियमावली त्यांनी आंदोलकांना दिली आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा मुंबईत धडकणार असल्याने राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेत..

View All the Podcast Episodes today!

Sakalaam Youtube Channel
img