महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न गेली 70 वर्षे प्रलंबित आहे. अलीकडच्या काळात सीमाप्रश्नाच्या विषयी मराठी भाषिकांची आंदोलने होतात खरी परंतु हा आता उपचाराचा भाग राहिला आहे. तब्बल 22 वर्षे झाली या वादाची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तारीख पे तारीख असा त्याचाही सिलसिला सुरू आहे. वास्तव म्हणजे अगदी केंद्र सरकार पासून राज्य सरकारपर्यंत या प्रश्नाबाबत सर्वांचीच उदासीनता दिसत असून सीमा प्रश्नाचे एक ज्येष्ठ अभ्यासक डॉ. दीपक पवार यांनी याविषयी मांडलेले परखड विचार.. #DrDeepakPawar #DrShriramPawar #MaharashtraDharm #Marathikaran #Marathi #Fedaralism #LanguagePolitics #Migration #Sakalaam #BaatSeBaatChale
सध्या गोकुळ निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि या वाऱ्यात महायुतीच्या गोटातून एक मोठा राजकीय स्फोट झाला आहे. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी असा काही बॉम्ब फोडलाय की ज्यामुळे महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुतीतील 'घराणेशाही', नेत्यांची 'मनमानी' आणि आपल्याला दिली जाणारी 'दुय्यम वागणूक' यावर जाहीर संताप व्यक्त केला आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे, 'जर आम्हाला इथे सन्मान मिळत नसेल, तर आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील हे काय आमचे वैरी नाहीत,' असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. नेमकं घडलंय काय? बैठकीत असं काय झालं की शिवाजीराव भडकले? हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत दादांवर त्यांचा एवढा राग का आहे? आणि गोकुळच्या आखाड्यात सतेज पाटलांसोबत खरोखरच नवी युती होणार का? या सर्व प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत. #GokulElection2026 #MushrifShivajiravPatil #SatejPatil #ChabdrakantDadaPatil #SamitKadam #satejpatil #buntypatil #chandrakantpatil #samitkadam #shivajipatil #mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk
इक्वेडोरचा जर्मनीवर ऐतिहासिक विजय, नेदरलँड-ऑस्ट्रेलिया बाद फेरीत!
26-06-2026
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये गुरुवारी रात्री सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. अटीतटीच्या सामन्यात इक्वेडोरने बलाढ्य जर्मनीचा २-१ असा पराभव करत थेट 'राऊंड ऑफ ३२' प्रवेश केला. या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषात इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी देशात अधिकृत सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.
'गट फ' मध्ये नेदरलँडने ट्युनिशियाचा ३-१ असा पराभव करून ७ गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले. या विजयामुळे नेदरलँडने बाद फेरीत ब्राझीलविरुद्धचा कठीण सामना टाळला असून, आता सोमवारी माँटेरी येथे त्यांचा सामना मोरोक्कोशी होईल. दुसऱ्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेविरुद्धचा सामना ०-० असा बरोबरीत सोडवत बाद फेरीचे तिकीट पक्के केले.
'गट इ' मधील अंतिम सामन्यात जपान आणि स्वीडन यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला, ज्यामुळे हे दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. तर दुसऱ्या एका अटीतटीच्या सामन्यात, तुर्कीयेने अमेरिकेचा ३-२ असा पराभव केला. स्टॉपेज टाईममध्ये कान आयहानने केलेल्या विजयी गोलमुळे सह-यजमान अमेरिकेला या विश्वचषकातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. कोल्हापुरातील फुटबॉल शौकिनांमध्ये बाद फेरीच्या या रंजक समीकरणांचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
छत्रपती शाहू महाराजांची 152 वी जयंती राज्यभर उत्साहात
26-06-2026
लोकराजा राजश्री शाहू महाराज यांना 152 व्या जयंती वर्षा निमित्त राज्यभर मानवंदना देण्यात आली. शाहूनगरी कोल्हापूर जिल्ह्यात उत्सवाचे वातावरण आहे. कोल्हापूरला सुजलाम सुफलाम करणाऱ्या राजश्री शाहूंच्या कार्याचे स्मरण करत विविध उपक्रमांनी लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली.
जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम राबवत जयंती सोहळा झाला. विविध कार्यक्रमांसह दिंडी यात्रा, शोभायात्रांनी दिवसभर वातावरण शाहूमय झाले. आजचा दिवस राज्यभर सामाजिक न्याय देणं म्हणून साजरा केला जातो.
शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी समता दिंडीचे हे आयोजन करण्यात आले होते. दिंडीचा प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आयुक्त राजेंद्र भारूड यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
आज लक्ष्मी विलास पॅलेस, दसरा चौकातील शाहू पुतळा, राजश्री शाहू स्मारक भवन यासाठी ठिकठिकाणच्या स्मारकांना विद्युत रोषणाई आणि शाहूंच्या फलकांनी सजवण्यात आले आहे. आज कोल्हापूर शाहूमय झाले आहे.
राम मंदिराच्या देणगीतील 2000 कोटी रुपये आमदार खासदार फोडण्यात वापरले, संजय राऊत यांचा आरोप
26-06-2026
अयोध्या राम मंदिर दान प्रकरणातील घोटाळ्याला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या प्राथमिक अहवालानंतर, राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. एसआयटी सध्या आरोपींची बँक खाती, मालमत्ता आणि मोबाईल रेकॉर्ड्सची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणात ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे.
याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकार तीव्र हल्ला चढवला. राऊत यांनी अत्यंत खळबळजनक आरोप करत सांगितले की, "राम मंदिराच्या दानपेटीवर तब्बल २,००० कोटी रुपयांचा डल्ला मारण्यात आला आहे,हा आकडा वाढण्याची ही शक्यता आहे. हा चोरीला गेलेला पैसा 100% राजकारणात आणि निवडणुकांमध्ये वापरला गेला आहे. याच पैशांच्या जोरावर आमदार आणि खासदार फोडण्यात आले आहेत!
राऊत यांनी पुढे खुलासा केला की, "राम मंदिर उभारणीसाठी उद्धव ठाकरे यांनी १ कोटी रुपये आणि ४ किलो वजनाची पवित्र चांदीची वीट दान केली होती. मात्र, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याची कोणतीही पावती वा माहिती मिळालेली नाही. ती चांदीची वीट नक्की कुठे गेली?" या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मेक्सिकोचा सलग तिसरा विजय, गट 'अ' मध्ये अव्वल स्थान
25-06-2026
फिफा विश्वचषक २०२६ मधील गट अ, ब आणि क मधील शेवटचे साखळी सामने अत्यंत रोमांचक ठरले. मेक्सिकोने आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत झेकीयाचा (Czechia) ३-० असा दारूण पराभव केला आणि 'गट अ' मध्ये अव्वल स्थान पटकावले. मेक्सिकोने इतिहास रचत आपल्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्व साखळी सामने जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या पराभवासह झेकीयाचे आव्हान संपुष्टात आले आहे. याच गटात दक्षिण आफ्रिकेने दक्षिण कोरियाला १-० ने हरवून नाबाद फेरीत धडक मारली.
'गट ब' मध्ये स्वित्झर्लंडने कॅनडावर २-१ असा विजय मिळवला, तर बोस्नियाने कतारचा ३-१ ने पराभव करून बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. 'गट क' मध्ये दिग्गज ब्राझीलने स्कॉटलंडचा ३-० असा धुव्वा उडवला, तर मोरोक्कोने हैतीचा ४-२ असा पराभव केला.
या सामन्यांच्या निकालांनंतर मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, कॅनडा, ब्राझील आणि मोरोक्को या ६ संघांनी अधिकृतपणे 'राऊंड ऑफ ३२' मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. कोल्हापुरातील फुटबॉल कट्ट्यांवर आता नाबाद फेरीच्या रंगणाऱ्या सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
व्हेनेझुएलात एका मिनिटात दोन भीषण भूकंप
25-06-2026
व्हेनेझुएलामध्ये बुधवारी एका मिनिटाच्या अंतराने ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केलचे दोन विनाशकारी भूकंप झाले, ज्यामुळे राजधानी कराकाससह अनेक शहरे हादरली. देशाच्या शतकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप असून, यामध्ये आतापर्यंत किमान १६४ जणांचा मृत्यू झाला असून ९७१ हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती कार्यवाहू अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी दिली. या भीषण आपत्तीमुळे कराकासचे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून शाळा निवारा केंद्रात बदलण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे भूकंप येण्यापूर्वी गुगलच्या 'अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम'ने प्राथमिक कंपने ओळखून नागरिकांच्या मोबाईलवर तात्काळ चेतावणी संदेश पाठवले होते. यामुळे भविष्यातील नैसर्गिक हानींपासून वाचवताना गूगलचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो.
या भीषण दुर्घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. व्हेनेझुएलाच्या सरकार आणि जनतेप्रती सहवेदना प्रकट करताना मोदी म्हणाले, "संकटाच्या या कठीण काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जखमींच्या जलद प्रकृतीसाठी आम्ही प्रार्थना करतो आणि भारताकडून व्हेनेझुएलाला सर्व संभाव्य मदत पुरवण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत.
आमच्या Spotify channel ला सबस्क्राईब करा किंवा थेट क्लिक करून ऐका